ठळक बातम्या

दिल्लीतील १३ वर्षांच्या भारतीय खेळाडूची कमाल

२८ चौकारांसह ३० षटकार ठोकत ३३१ धावांची धमाकेदार खेळी
नवी दिल्ली – भारतीयांसाठी सर्वात मुख्य, महत्त्वाचा आणि आवडता खेळ म्हटले की क्रिकेट. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांमधून संघात खेळणाऱ्या काही खेळाडूंमध्ये काहीतरी विशेष असणार हे अवघ्या क्रिकेट जगताने मानले आहे. त्यामुळे भारतात दर काही वेळेनुसार एका नव्या टॅलेंटचा जन्म होतच असतो. नुकतीच दिल्ली येथेही १३ वर्षांच्या मोहक कुमारने दमदार फलंदाजी करीत आपल्या अभूतपूर्व खेळीने त्याची प्रचिती दिली.
दिल्लीत सुरू असलेल्या ड्रीम चेंजर्स चषकात दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमी आणि अँड्योरेन्स क्रिकेटर अकादमी यांच्यात सामना पार पडला. यावेळी दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीकडून चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोहक कुमारने २८ चौकार आणि ३० षटकार ठोकत शानदार खेळीचे दर्शन घडवले. १३ वर्षांच्या मोहक कुमारने १३७ मिनिटे फलंदाजी करीत २६४.८० च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्या. त्याने केलेल्या ३३१ धावांना शिवाई मलिक (६७) आणि आर्यन भारद्वाज (४०) यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे त्यांनी ४० ओव्हरमध्ये ७ विकेट्सच्या बदल्यात ५७६ धावा केल्या.
मोहक कुमारच्या त्रिशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिट्लस बाल भवनने ५७६ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेला समोरचा संघ (अँड्योरेन्स क्रिकेटर अकादमी) १७.१ ओव्हरमध्ये १५३ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून मेधांशने सर्वाधिक म्हणजे ५३ चेंडंूत १२६ धावांची खेळी केली, तर वामनने २९ धावांच्या बदल्यात ५ आणि यतिनने ४५ धावांच्या बदल्यात ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स बाल भवनने धावसंख्येतील मोठ्या फरकाने सामना जिंकला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: Web Hosting