सोशल मीडियावर जॉन अब्राहम आणि नोरा फतेही यांच्यावरून अनेक मीम्स बनले आहेत. जब तक सूरज-चांद रहेगा, जॉन की फिल्मो में नोरा का नाम रहेगा, दुनिया इधर से उधर हो सकती है लेकीन जॉन की फिल्म से नोरा नहीं जा सकती अशाप्रकारचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
‘सत्यमेव जयते २’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडिया युजर्स ॲक्टिव्ह झाले होते. नोराच्या उपस्थितीबद्दल युजर्सनी अनेक प्रश्नही केले होते. आता चाहत्यांकरिता खूशखबर आहे की, नोरा आणि जॉनचा आयटम नंबर रिलीज झाला आहे. बुधवारी नोराचे आयटम साँग कुसू कुसू रिलीज झाले आहे. हे गाणे तनिष्क बागचीने कंपोझ केले आहे, तर गाण्याला झारा खान आणि देव नेगीने आपला आवाज दिला आहे. या गाण्यात नोराचा खूपच ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. गाण्यात नोराने गोल्डन आणि पिवळ्या ड्रेसचे कॉम्बिनेशन घातले आहे. या चित्रपटाशी जोडल्या गेल्याबाबत बोलताना नोरा म्हणाली,’सत्यमेव जयतेचा माझ्या आयुष्यात खास दर्जा आहे. मी याच्या सिक्वलचाही हिस्सा बनून खूप खूश आहे. दिलबरच्या यशानंतर दिलरुबाद्वारे परत येण्याची फिलींग खूप चांगली आहे. मी मिलाप झव्हेरी आणि निखिल आडवाणी तसेच भूषण सरांची आभारी आहे की, त्यांनी मला ही संधी दिली.