दिग्गज मॅराडोनांचे किमती घड्याळ चोरणाऱ्याला आसाममधून अटक

गुवहाटी – आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांच्या मदतीने एक महत्त्वाची मोहीम पार पाडली आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू डिएगो
मॅराडोना यांचे घड्याळ चोरणाऱ्या व्यक्तीला शिवसागर जिल्ह्यातून शनिवारी अटक करण्यात आली आहे. आसाम आणि दुबई पोलिसांनी मिळून ही कारवाई केली आहे, तसेच आरोपीकडून घड्याळही जप्त केले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आसाम पोलिसांचे पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी दुबई पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाई संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डिएगो मॅराडोना यांचे घड्याळ आसामच्या शिवसागर जिल्ह्यातून जप्त करण्यात आले आहे, त्यासोबत त्या व्यक्तीला ही अटक केली आहे.

महासंचालकांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, आम्ही शिवसागर जिल्ह्यातील मोरानहाट भागातून वाजिद हुसेन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ज्याच्याकडून दिवंगत फुटबॉलपटू डिएगो
मॅराडोना यांचे ह्युब्लोट या कंपनीचे लिमिटेड एडिशन घड्याळ जप्त केले आहे. ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तो मूळचा आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील असल्याची माहितीही डीजीपींनी दिली. अटक केलेला व्यक्ती दुबईमध्ये काम करत होता आणि ऑगस्ट २०२१ मध्ये भारतात परत आला होता. त्यांना गुप्तचर माहिती मिळाली होती. ज्या अंतर्गत पोलिसांनी वाजिद हुसैन याला मोरनहाट भागात त्याच्या सासरच्या घरातून अटक केली आणि दिवंगत फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे मनगटी घड्याळ जप्त केले आहे. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. संयुक्त आंतरराष्ट्रीय मिशन अंतर्गत आसाम पोलीस आणि दुबई पोलिसांनी वाजिद हुसेन नावाच्या व्यक्तीकडून दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे घड्याळ जप्त केले आहे. वाजिदला कायद्यानुसार शिक्षा होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …