दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगची क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली – कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज व दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगने शुक्रवारी आपल्या शानदार क्रिकेट करिअरचा शेवट केला. पंजाबच्या ४१ वर्षीय खेळाडूने आपल्या शानदार करिअरमध्ये १०३ कसोटीत ४१७ विकेट, २३६ वनडेत २६९ विकेट व २८ टी-२० सामन्यात २५ विकेट मिळवल्यात.

आपल्या निवृत्तीबाबत हरभजन म्हणाला की, मागील काही वर्षांपासून याचा मी विचार करत होतो व आता मी याची घोषणा करत आहे. या ऑफ स्पिनरने ट्विट केले की, मी या खेळाचा निरोप घेतोय, ज्याने माझ्या जीवनात खूप काही दिले. सर्व चांगल्या गोष्टींचा केव्हा ना केव्हा निरोप घ्यावा लागतोच. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी २३ वर्षांच्या या मोठ्या प्रवासाला सर्वोत्तम व अविस्मरणीय बनवले. तो पुढे म्हणतो, जालंधरच्या छोट्या गल्ल्यापासून भारतीय संघाचा ‘टर्बनेटर’ बनण्यापर्यंत मागील २५ वर्षांचा प्रवास आनंदमय राहिला. हरभजनने १९९८ साली शारजामध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो २०१६ साली भारताच्यावतीने ढाकामध्ये संयुक्त अरब अमिरातविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीयच्या निमित्ताने आपला अखेरचा सामना खेळला. तो म्हणाला की, मला भारतीय संघाच्या जर्सी (मैदानात खेळताना) मध्ये निवृत्ती घेण्याची अपेक्षा होती, पण असे झाले नाही. त्याने या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे, ज्यात तो म्हणाला की, सर्व क्रिकेटपटूंप्रमाणे मला देखील भारतीय जर्सीमध्ये निवृत्ती घ्यायची होती, पण नशिबाला आणखीन काही मान्य होते. तो म्हणतो, एक वेळ अशी येते, जेव्हा आपणास कठीण निर्णय घ्यावे लागतात व जीवनात पुढे जावे लागते. मानसिकरित्या मी खूप आधीच निवृत्ती घेतली आहे, पण त्याची घोषणा करू शकत नव्हतो. मी मागील अनेक महिने क्रिकेटमध्ये सक्रिय नव्हतो. हरभजनने कोलकाता नाइट रायडर्ससाठी मागील वेळी आयपीएलच्या सुरुवातीच्या लीग फेरीदरम्यान काही सामन्यात भाग घेतला, पण तो लीगच्या युएई सत्रात त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. तो म्हणतो, मी अनेक वेळेपासून सक्रिय क्रिकेट खेळत नाही आहे, पण कोलकाता नाइट रायडर्ससोबत आपल्या वचनबद्धतेबाबत आयपीएल सत्रादरम्यान त्यांच्यासोबत राहू इच्छित होतो. दरम्यान, मी सत्राच्यावेळीच निवृत्तीबाबत आपले मन निश्चित केले होते. मी ज्यादेखील संघासाठी खेळलो, त्यांच्यासाठी शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मग भारतीय संघ असो, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, सरे वा एसेक्स काऊंटी.
हरभजनने मार्च २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३२ विकेट घेतल्या होत्या, ज्यात एका भारतीयद्वारे पहिल्या कसोटीत हॅट्ट्रिक घेण्याचा समावेश होता. हे त्याच्या शानदार कारकिर्दपैकी एक शानदार क्षण होते. भारतीय संघाने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती व हे क्रिकेटवेड्या या देशाच्या सर्वात ऐतिहासिक क्षणांपैकी एक आहे. तो म्हणाला, मला आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वात जास्त आनंद तेव्हा मिळाला, जेव्हा मी कोलकातामध्ये हॅट्ट्रिक मिळवली होती व मी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनलेलो. मी तीन सामन्यात ३२ विकेट मिळवल्या होत्या, जो अद्याप एक विक्रम आहे. भज्जी नावाने प्रसिद्ध हा फिरकीपटू पुढे म्हणतो की, माझ्यासाठी २००७ (टी-२०) व २०११ (वनडे) विश्वचषक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. मी हे अविस्मरणीय क्षण आपल्या जीवनात केव्हाच विसरणार नाही. त्या विजयाचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हरभजनने या व्हिडीओत आपले आई-वडील, आपले आध्यात्मिक गुरू, आपली पत्नी व मुलांचे आभार मानले. तो म्हणाला, आता मी त्या वेळेची भरपाई करण्याचा प्रयत्न करेन, जे मी आपल्या क्रिकेट वचनबद्धतेसाठी त्यांच्यासोबत करू शकत नव्हतो. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी अथक मेहनत घेतली. जर मी पुन्हा जन्म घेतो, तर मला त्यांच्या मुलाच्या रूपात जन्म घ्यायचा आहे. माझी पत्नी गीता, तुझे प्रेम मला संपूर्ण बनवते. तू माझा सर्वोत्तम व वाईट काळ पाहिला आहेस. आता तू मला वेळ देत नाहीस ही तक्रार करण्याची संधी मी तुला देणार नाही. मला आनंद आहे की, माझ्यासाठी आपल्या मुलांसाठी आता वेळ असेल व त्यांना मोठे होताना पाहायचे आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …