दामोदर मावजो आणि नीलमणी फूकन यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार

कोकणी, आसामीचा सन्मान
नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च सन्मानाचा साहित्य पुरस्कार असलेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार यावर्षी दोन साहित्यिकांना जाहीर झाला आहे. कोकणी कथा, कादंबरीकार दामोदर मावजो आणि आसामी कवी नीलमणी फूकन यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. संस्थेने मंगळवारी ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली. दरवर्षी जगभर जशी साहित्याच्या नोबेल पुरस्काराची प्रतिक्षा असते तशीच प्रतिक्षा ज्ञानपीठ पुरस्काराचीही असते. ज्ञानपीठ हा देशातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो. आसामी भाषेतील साहित्यिकाला ज्ञानपीठ मिळण्याची ही तिसरी वेळ आहे, तर कोकणी भाषेतले हे दुसरे ज्ञानपीठ आहे. यापूर्वी आसामी भाषेत १९७९ साली बी. के. भट्टाचार्य आणि २००० साली इंदिरा गोस्वामी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता नीलमणी फूकन यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणी भाषेत मावजोंच्या आधी २०१६ साली रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ दिले गेले होते. त्यानंतर आता मावजोंचा या सवार्ेच्च पुरस्काराने सन्मान होत आहे. ११ लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …