दानवे विनोदी बोलतात – खा. विनायक राऊत

मुंबई – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना विनोदाने बोलण्याची सवय आहे, तर नारायण राणे यांच्या कुटुंबाचा पिंडच विकृ तीचा आहे, अशी टीकेची झोड खासदार विनायक राऊतांनी बुधवारी उठवली. एकीकडे मराठवाड्यात महाविकास आघाडीचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर स्तुतिसुमने उधळल्याने नवीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यांचाही राऊतांनी समाचार घेतला.
रावसाहेब दानवे यांनी १ जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये बोलताना अक्षरश: फटाक्यांची माळ फोडली होती. उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील? अशावेळी विनाप्रमुखांचे राज्य कसे चालेल? असा सवालही त्यांनी केला होता. खासदार विनायक राऊत म्हणाले की, रावसाहेब दानवेंचे विधान गांभीर्याने घेण्यासारखे नाही. त्यांना विनोदाने बोलण्याची सवय आहे. भाजपचे विचार त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केले. राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा कारभार चांगला चालवत आहेत, याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, नारायण राणेच्या कुटुंबाचा पिंड विकृ तीचा आहे. ही विकृती गाडण्याचे काम सिंधुदुर्गाच्या जनतेने केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …