दहा वर्षांतील अपघातांत देशाने गमावले 42 लष्करी जवान


नवी दिल्ली : बुधवारी कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकारी आणि जवान मृत्युमुखी पडले. देशात मागील दहा वर्षांत विविध हेलिकॉप्टर अपघातांत आतापर्यंत देशाने 42 लष्करी जवान गमावले आहेत. 2010 पासून आतापर्यंत असे पाच हेलिकॉप्टर अपघात घडले आहेत. 19 डिसेंबर 2010 मध्ये तवांग अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या एमआय-17 च्या हेलिकॉप्टर अपघातात 12 जवांनाना प्राण गमवावे लागले. त्यात दोन वैमानिक आणि एका अधिकार्‍याचाही समावेश होता. गुवाहाटीला जाणार्‍या हेलिकॉप्टरने तवांग हेलिपॅड येथून उड्डाण घेताच काही मिनिटांतच हा अपघात झाला.

30 ऑगस्ट 2012 मध्ये जामनगर गुजरात येथे विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हवेतच अपघात होऊन एमआय-17 हेलिकॉप्टरमधील पाच अधिकार्‍यांसह वायुदलाच्या नऊ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. बॉम्बहल्ला मिशनच्या अभ्यासादरम्यान हा अपघात झाला. अरुणाचलप्रदेशातच 6 ऑक्टोबर 2017 रोजी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन सात जणांना प्राण गमवावे लागले. 27 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सर्व सहा कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

 

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …