दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार?

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करून घेण्याचे काम सुरू आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने परीक्षादेखील ऑफलाइन मोडद्वारे होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर दहावीसाठी परीक्षा अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र १८ नोव्हेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी माध्यमिक शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल करून घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाईल, असे भोसले म्हणाले होते. २०२२ ची परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची यासंदर्भात म्हणणे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने राज्य सरकारला कळवले असल्याची माहिती अशोक भोसले यांनी दिली. राज्य सरकारकडून यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल, असे अशोक भोसले यांनी म्हटले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …