दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले

  •  जखमींना पाठवले रुग्णालयात

पुणे – राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. दत्तात्रय भरणे शनिवारी त्यांचा विधानसभा मतदारसंघ इंदापूरच्या दौऱ्यावर होते. अशात भरणे इंदापूरहून जात असताना त्यांच्या समोर इंदापूर बारामती रस्त्यावर एका दुचाकी स्वार आणि टेम्पोचा अपघात झाला. अपघात झाल्याचे समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्यांना ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिले.
इंदापूर बारामती रस्त्यावर अपघात झाल्याचे पाहून दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. राज्यमंत्री भरणे, त्यांचा स्वीय सहाय्यक आणि पोलीस अधिकारी यांनी अपघातग्रस्ताला मदत केली. अपघात ग्रस्तांना पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दत्तात्रय भरणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होत आहे. तसेच भरणे हे नेहमीच अपघातग्रस्तांना मदत करताना दिसून येतात. नोव्हेंबर महिन्यातही अपघात झाल्याचे दिसताच भरणे यांनी आपला ताफा थांबवला होता. राज्यमंत्री भरणे यांनी त्यावेळी अपघातग्रस्तांची विचारपूस करत धीर दिला होता. महामार्गावर झालेला अपघात पाहताच भरणे यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …