दक्षिण आफ्रि केत आता नव्या आजाराचा शिरकाव – डब्ल्यूएचओने रॅपिड रिस्पॉन्स टीम पाठविली

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची नोंद करण्यात आली होती. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. अशातच येथे नव्या आजाराने शिरकाव केला आहे. दक्षिण सुदान देशातील जोंगलेई राज्यात असणाºया फांगक शहरात एका गूढ आजारामुळे आतापर्यंत ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आजार नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने वैज्ञानिकांची रॅपिड रिस्पॉन्स टीम याठिकाणी पाठवली आहे.
यूएनएचसीआरने दिलेल्या माहितीनुसार, या देशात सुमारे ६० वर्षांमधील सर्वात मोठा महापूर आला होता. या महापुराचा जोंगलेईच्या सीमेवर असणाºया राज्यांमधील ७ लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. या महापुरानंतर जोंगलेईच्या आजूबाजूला असणाºया शहरांमध्ये मलेरियासारख्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असल्याची माहिती देशाचे जमीन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपयोगिता मंत्री लॅम तुंगवार कुडगवोंग यांनी दिली. महापुरामुळे निर्माण झालेल्या अन्नटंचाईमुळे लहान मुलांमध्ये कुपोषण वाढले आहे. पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे कित्येक पाळीव प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. महापुरामुळे अन्न आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची मदतही पोहोचवणे अवघड झाले असल्याचे लॅम यांनी सांगितले. या भागात काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था मेडेकिन्स सॅन्स फ्रंटीयर्स यांनी सांगितले, की महापुरानंतर येथील वैद्यकीय सेवांवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आहे.
…………

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …