दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लोकेश राहुल उपकर्णधार

नवी दिल्ली – सलामी फलंदाज लोकेश राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी शनिवारी याबाबत स्पष्ट केले. रोहित शर्माला मालिकेसाठी विराट कोहलीचा उत्तराधिकारी बनवण्यात आले, पण मांसपेशी ताणल्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला. राहुल आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळला आहे. या २९ वर्षीय खेळाडूने या फॉरमेटमध्ये सहा शतकांच्या मदतीने ३५.१६ च्या सरासरीने २३२१ धावा केल्या. राहुलला भविष्यातील भारतीय कर्णधाराच्या रूपात पाहिले जात आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, के. एल. राहुल तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार असेल. अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितला कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आलेले, पण दौऱ्याआधी मुंबईतील नेट सत्रादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. त्यातून सावरण्यासाठी त्याला कमीत कमी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. निवडकर्त्यांसाठी अशात पुन्हा रहाणेकडे जबाबदारी देणे कठीण असते, कारण त्याची जागा अंतिम संघात निश्चित नाही. त्यासोबतच ऋषभ पंतला राष्ट्रीय संघात उपकर्णधार म्हणून पदोन्नती देणे जास्त घाईचे झाले असते. राहुल त्या निवडक विशेषज्ज्ञ फलंदाजांपैकी एक आहे, जो सर्व फॉरमेटमध्ये खेळतो. राहुलचे वय व त्याचा अनुभव त्याच्या बाजूने जातो, जो विराटनंतर अनेक वर्ष संघाचे नेतृत्व करू शकतो. अशी देखील अपेक्षा आहे की, राहुल येणाऱ्या काळात मर्यादित षटकांच्या फॉरमेटचा देखील उपकर्णधार होईल. आयपीएलची नवी फ्रँचायजी लखनऊसाठी देखील त्याच्या कर्णधारपदाबाबत चर्चा सुरू आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …