दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉक घेणार माघार!

टीम इंडियाला दिलासा
मुंबई – टीम इंडिया गुरुवारी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. दोन्ही देशांमधील पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक वैयक्तिक कारणामुळे संपूर्ण सीरिज खेळणार नाही. तो २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल, पण नंतरच्या दोन कसोट्यांमधून तो माघार घेणार आहे.

डी कॉकची पत्नी साशा हार्ली सध्या गर्भवती आहे. त्यांना जानेवारी महिन्यात बाळ होणार आहे. त्यामुळे तो शेवटच्या दोन कसोट्या खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये काइल वेरेन खेळण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. दोन कसोट्यांच्या ब्रेकनंतर १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी डी कॉक उपलब्ध असेल.
क्विंटन डी कॉकने माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, तो दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज आहे. त्याने कसोटी कारकिर्दीमध्ये ५३ सामन्यांमध्ये ३४२५ धाव बनवल्या आहेत. यामध्ये सहा शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेत आजवर २० कसोटी सामने खेळले असून त्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत आजवर एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २०१८ साली आफ्रिकेत झालेली कसोटी मालिका भारतीय टीमने १-२ अशा फरकाने गमावली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर तीनच टीमनी (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका) दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …