दक्षिण आफ्रिकेचा ‘ऑलराऊं डर’ ख्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मॉरिसने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. ख्रिस मॉरिस यापुढे देशांतर्गत संघ टायटन्ससोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्याने सांगितले. ख्रिस मॉरिसने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ख्रिस मॉरिसने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने असे म्हटले की, आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करीत आहे! माझ्या प्रवासात ज्या लोकांचा सहभाग होता, त्यांचे मी आभार मानतो. मग ती व्यक्ती लहान किंवा मोठी असो. हा प्रवास खूप मजेदार होता, असे ख्रिस मॉरिसने या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेट संघ टायटन्सने त्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याने त्याने आनंद व्यक्त केला आहे.
३४ वर्षीय ख्रिस मॉरिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. मॉरिसने ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या असून, ४६७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने २३ सामन्यांत ३४ विकेट्ससह १३३ धावा केल्या आहेत, तर जगभरातील विविध लीगमध्ये खेळल्या गेलेल्या २३४ सामन्यांमध्ये मॉरिसने २९० विकेट्ससह १ हजार ८६८ धावा केल्या आहेत. ख्रिस मॉरिस दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. तो आयपीएलचा मोठा खेळाडूही आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत आमने-सामने येत असताना ख्रिस मॉरिसने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, मात्र मॉरिस या मालिकेमध्ये खेळणार नव्हता.
आयपीएल २०२१ पूर्वी झालेल्या लिलावात सर्वांचे अंदाज चुकवून ख्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाखांना खरेदी केले होते. आजवरच्या आयपीएल लिलावात कोणत्याही खेळाडूवर लावण्यात आलेली ही सर्वात जास्त बोली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …