शारजाह – वर्णद्वेशाविरुद्धच्या मोहिमेत गुडघ्यावर बसण्याच्या सांकेतिक पाठिंब्याला नकार दिल्यानंतर सामन्यातून माघार घेणारा क्विंटन डिकॉक दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांच्यातील टी-२० विश्वचषक सुपर-१२ सामन्यात शनिवारी येथे मैदानात उतरू शकतो.
डिकॉकने गुरुवारी वक्तव्य जारी करत टी-२० विश्वचषकाच्या इतर सामन्यांत स्वत:ला उपलब्ध ठेवले होते. तो म्हणाला की, जर माझे गुडघ्यावर बसून दुसऱ्यांना शिक्षित करण्यास मदत मिळते, तर मला असे करण्यास कोणतीच अडचण नाही. डिकॉक म्हणाला की, वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात असे न केल्यास मला वर्णद्वेशी म्हटले गेले, ज्यामुळे मला खूप वाईट वाटले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ८ विकेटने जिंकला. डिकॉकच्या पुनरागमनाने दक्षिण आफ्रिकेची पहिली फळी बळकट होईल, तसेच हा डावखुरा फलंदाज मोठी खेळी करत टीकाकारांचे तोंड बंद करू पाहिल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाने विश्वचषकात आतापर्यंत १२ व दोन धावा केल्या व तो फॉर्मात परतण्यास उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेकडू रिझा हँड्रिक्स, रासी वान डर डुसेन, एडेन माक्रराम व विश्वसनीय डेव्हिड वॉर्नरसारखे फलंदाज आहेत, जे कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला उद्ध्वस्त करू शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना श्रीलंकेचे फिरकीपटू वानिंदु हसरंगा व महीश तीक्षणा यांच्यापासून सतर्क राहावे लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडीजविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. या सामन्यात वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने तीन विकेट मिळवले. त्यांच्याकडे अखेरच्या षटकात दोन सर्वोत्कृष्ट गोलंदाज कॅगिसो रबाडा व एनरिच नॉर्जे आहेत व पुढील सामन्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. दक्षिण आफ्रिकेचे दोन स्पिनर केशव महाराज व तबरेज शम्सी यांना ही महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल. श्रीलंका मात्र ऑस्ट्रेलियाकडून ७ विकेटने मिळालेला पराभव विसरत नव्याने सुरुवात करू पाहिल. त्यांच्यासाठी चरिथ असलंकाचा चांगला फॉर्म सकारात्मक बाजू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात करणारा कुसाल परेरा ही चांगली सुरुवात करू पाहिल. सलामी फलंदाज पथुम निसांका व अविष्का फर्नांडोचे सलग अपयश संघासाठी चिंतेची बाब असेल. वेगवान वानिंदु हसरंगा व भानुका राजपक्षेची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिका करुणारत्ने, दुशमंत चमिरा व लाहिरू कुमारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू शकले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यासाठी त्यांना योग्य ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. सामन्यात दवबिंदूची भूमिका महत्त्वाची राहील. या सामन्यातील निकाल दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल, त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.