थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक नियमांची पायमल्ली, तळीरामांना मुंबई पोलिसांचा दणका

मुंबई- सुमारेदोन वर्षांपासून चालू असलेल्या कोरोनाच्या सावटातून कुठे सुटल्याचेवाटत होते इतक्या वर्षसरतेशेवटी ओमायक्रॉनने उडी मारली. नवीन वर्षाच्या आगमनाची वाट पाहत असलेल्या प्रत्येकाच्याच आनंदावर निर्बंध लागले. मुंबईसह महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टसाठी कार्यक्रमांचं आयोजन न करणे, नाईट कर्फ्यू तसेच लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नयेकलम १४४ लागू करण्यात आले, मात्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ३७५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर वाहनेचालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांनी केलेल्या कारवाईची दिलेली आकडेवारी ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून ते १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत आहे.
सर्वनिर्बंध लागूअसतानाही थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी अनेक लोक घराबाहेर पडलेपाहायला मिळाले. अशातच अनेक तळीरामांकडून वाहन चालवत वाहतूक नियमांची पायमल्लीही करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियमांतर्गत कारवाई व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी मुंबईत पोलिसांकडून निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी म्हणजेच थर्टीफर्स्टच्या रात्री अनेक वाहनेरस्त्यावर होती आणि प्रत्येकाला नाकाबंदीतून जावे लागले. यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी १८ जणांविरुद्ध दारु पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी रॅश ड्रायव्हिंगचेगुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या ४०८ जणांवर, ट्रिपल सीट बाईक चालवल्याप्रकरणी १६ जणांवर, तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ३७५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …