सलीम पटेलसोबत आर. आर. पाटील यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप करण्यात आला होता

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे गंभीर आरोप त्यांनी नवाब मलिक यांच्यावर केले आहेत. मात्र, असं करताना त्यांनी २०१०मध्ये राज्याचे गृहमत्री आर. आर. पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर देखील खुलासा केला आहे. दिवंगत आर. आर. पाटील यांचे दाऊद गँगचा सदस्य सलीम पटेल याच्यासोबतचे व्हिडीओ आणि फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. त्यावरून आर. आर. पाटील यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचे देखील आरोप झाले. मात्र, आता त्याय प्रकरणाशी आर. आर. पाटील यांचा संबंध नसल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.