‘त्या’ गदारोळावर बीसीसीआयचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – कानपूरमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कॅटरिंग मेनू उघड झाला होता. मेनूमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले की, बीफ आणि पोक दिले जाणार नाही. तसेच जे काही मांस बनवले जाईल, ते हलाल मांसापासूनच बनवले जाईल. सहाय्यक कर्मचारी आणि वैद्यकीय टीमने खेळाडंूच्या पोषणाचा विचार करून ही आहाराची यादी तयार केली आहे. याबाबत आता बीसीसीआयने मोठा खुलासा केला आहे.

भारतीय संघाच्या डाएट प्लॅनवरून वाढलेला गोंधळ पाहून बीसीसीआयला पुढे येत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. भारतीय खेळाडूंना फक्त हलाल मीट दिले जाईल, अशी सर्व वृत्ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी फेटाळून लावली आहेत. धुमाळ म्हणाले की, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ काहीही खाऊ शकते, हा त्यांच्या वैयक्तिक आवडीचा विषय आहे. मंडळाने अशी कोणतीही योजना कधीच केलेली नाही. रेसिपीमध्ये दोन प्रकारचे मांस नमूद केले आहे. चिकन (पोल्ट्री) आणि बकरीचे मास. सूचीबद्ध मांसाहारी खाद्यपदार्थांमध्ये भाजलेले चिकन, भाजलेले बकरीचे मास, काळी मिरचीच्या सॉससह लँब चॉप्स, चिकन थाई करी, मसालेदार ग्रील्ड चिकन, गोवन फिश करी, तंगडी कबाब आणि फ्राइड विथ गार्लिक चटणी चिकन यांचा समावेश आहे. अरुण धुमाळ यांच्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास, डाएट प्लॅनबद्दल याआधी कधीच बोलणे झालेले नाही, त्यामुळे तो लादण्याचा मुद्दा निराधार आहे. काय खावे आणि काय खाऊ नये, हे बीसीसीआय कोणाला सांगत नाही. भारतीय संघाचा नवा मेनू इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यामुळे बीसीसीआय प्रचंड ट्रोल झाले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …