ठळक बातम्या

त्याला आला आहे श्रीमंतीचा कंटाळा

आपल्या श्रीमंतीचा कंटाळा आल्याचे तुम्ही क्वचितच ऐकले असेल. अनेकदा आपल्याला असे वाटते की, पैशाने आपल्या सर्व समस्या सोडवता येतात, परंतु एका ब्रिटिश व्यक्तीने लक्षाधीश झाल्यानंतर त्याचा अनुभव शेअर केला आहे आणि म्हटले आहे की, त्याला त्याचे जुने आयुष्य खूप आठवत आहे.
आॅनलाइन शेअरिंग साइट रेटीटवर आपल्या अनुभवाचे वर्णन करताना, व्यक्तीने सांगितले की, त्याने २०१४ पासून बिटकॉइनबद्दल शिकण्यास सुरुवात केली आणि दीड वर्षापर्यंत त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले. या व्यक्तीने आपली संपूर्ण बचत बिटकॉइनमध्ये गुंतवली. मग त्याच्या बाबतीत जे झाले ते प्रत्येकाचेच स्वप्न असते.

२०१७ मध्ये, या व्यक्तीला त्याच्या क्रिप्टोकरन्सीमधून २०० दशलक्षचा थेट फायदा झाला. २ वर्षांनंतर २०१९ मध्ये त्याला आणखी ६२ कोटी रुपयांचा नफा झाला. यावेळी तो ३५ वर्षांचा होता आणि तो करोडपती झाला होता. करोडपती होताच या व्यक्तीने नोकरी सोडली, पण काही काळानंतर त्याला पश्चाताप होऊ लागला. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याला त्याचे समृद्ध जीवन खूप कंटाळवाणे वाटते. त्याला त्याचे जुने दिवस रोज आठवतात, पण तो त्या आयुष्यात परत येऊ शकत नाही.
आपल्या पोस्टमध्ये या व्यक्तीने म्हटले आहे की, त्याला आॅफिसमध्ये काम करण्याची मजा आठवते. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, तो त्याच्या आवडीच्या अनेक वस्तू खरेदी करू शकतो, तरीही तो ते जुने दिवस परत आणू शकत नाही. हा पैसा आपल्याला आपल्या मेहनतीतून नव्हे, तर फसवणुकीतून मिळाला याचेही त्याला दु:ख आहे. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती पहिली कंटेंट क्रिएटर होती आणि महिन्याला २५ लाख रुपये कमवत होती. यादरम्यान, त्याने आपले पैसे वाचवले आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली, ज्याचा फायदा मिळाल्यानंतर ती व्यक्ती करोडपती झाली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …