नागपूर – नागपूरसह अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांतील भाजपच्या विजयाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी स्वत: निवडून आलो, त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीला चपराक आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, आज माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो, त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीला चपराक आहे. तिकडे अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. एकूणच विधानपरिषदेच्या ६ पैकी ४ जागी भाजप निवडून आली आहे. महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले, म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित मांडले गेले ते चुकीचे ठरले. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, भविष्यातही आम्हाला आशीर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे. आमचे राष्ट्रीय नेते मोदी, अमित शहा, नड्डा यांचे आभार. ते पुढे म्हणाले, मी विशेष आभार मानतो नितीन गडकरी यांचे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढलो आणि आम्हाला विजय मिळाला. विजयाच्या मालिकेची सुरुवात यानिमित्ताने झाली आहे. महाविकास आघाडीची मते ही नागपूर आणि अकोल्यात मिळाली. ज्यांनी मते दिली त्या सर्वांचे आभार मानतो.