ठळक बातम्या

त्याच्या बाल्कनीतून शेकडो बाहुल्या डोकावून पाहतात

हॉलीवूडच्या हॉरर चित्रपटांमध्ये तुम्ही अनेकदा भयंकर आणि भयावह बाहुल्या पाहिल्या असतील, ज्यांच्यामध्ये आत्म्याचा वास असतो. अशी एखादी बाहुली दिसली, तर भीतीने लोकांना थरथर कापरेच भरते. अशा स्थितीत विचार करा, जर एखाद्या ठिकाणी शेकडो बाहुल्या बाल्कनीतून डोकावताना तुम्हाला पाहत असतील तर काय होईल?
व्हेनेझुएलाच्या कराकसमध्ये असेच एक घर आहे, ज्याची बाल्कनी विचित्र आकाराच्या बाहुल्यांनी झाकलेली आहे. त्याची एक झलक पाहिली, तर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.

भयावह गोष्टींवर तुमचा विश्वास असो वा नसो, पण एखादी भीतीदायक गोष्ट दिसली की, हृदय जोरात धडधडू लागते. असाच काहीसा अनुभव कराकस येथे फिरायला येणाºया पर्यटकांना येतो. येथे जेव्हा ते एका विशिष्ट ठिकाणी क्रेपी डॉल्स भरलेल्या बाल्कनीतून डोकावताना त्यांना दिसतात.
हे रहस्यमय ठिकाण एवेनिडा इस्टेट १२ मध्ये आहे. स्थानिक लोक हे ठिकाण एल मुएर्टो कॉर्नर म्हणून ओळखतात. ही एक दोन मजली इमारत आहे, जिथे बाल्कनी जुन्या बाहुल्यांनी झाकलेली आहे. काहींचे हात-पाय बाल्कनीच्या रेलिंगलाही लोंबकळत आहेत. अशा स्थितीत हे दृश्य जो पहिल्यांदा पाहतो त्याला धक्काच बसतो.

व्हेनेझुएलाच्या राजधानीत स्थानिक आणि बाहेरचे लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. ज्यांना एल मुएर्टोबद्दल माहिती आहे, ते घरातून लवकर निघून जातात आणि वर पाहत नाहीत. होय, ज्या लोकांना भीतीदायक कथा आवडतात, ते बाल्कनीत नक्कीच पाहतात, जिथून शेकडो बाहुल्या त्यांच्याकडे टक लावून पाहत असतात. दिवसाही येथे पाहुणे येतात, पण अनेकजण रात्री येथून जाणे टाळतात. हवामानामुळे या बाहुल्यांच्या चेहºयावरची घाण काळी पडली असून, त्यांचे कपडेही फाटले आहेत. ग्रीलला लटकलेले हात-पाय पाहून अनेकजण येते भीतीने ओरडतानाही आढळतात.
या बाहुल्या इथे का लटकल्या आहेत हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घुमतो. असे म्हटले जाते की, काही वर्षांपूर्वी, व्हिज्युअल आर्टिस्ट एतानिस गोन्झालेझ या घरात राहत होते आणि त्यांनी बाहुल्यांनी भरलेली बाल्कनी बनवली होती, जी आता संग्रहालयात नेण्यात आली आहे. फळ ?????नुसार, आर्टिस्ट एतानिस गोन्झालेझचा मुलगा म्हणतो की, त्याच्या वडिलांना त्यांच्या ट्रक ड्रायव्हरच्या मित्राकडून प्रेरणा मिळाली, ज्याने ट्रक बाहुल्यांनी सजवला होता. ही बाल्कनी बाहुल्यांनी भरायला त्यांना ३ वर्षे लागली. स्थानिक लोकांच्या स्वत:च्या कथा आहेत, ते म्हणतात की येथे राहणारे लोक काळी जादू करत असत. काही लोक असेही म्हणायचे की, या बाहुल्या खरंतर मुले आहेत. यामागे या सगळ्या कथा असल्या तरी जरी हे एक कलात्मक कार्य आहे असे आता घोषित केले गेले आहे. जे एतानिस गोन्झालेझ यांनी तयार केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …