ठळक बातम्या

तो विचार मी केव्हाच केला नव्हता – हर्षल

रांची – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासह आपली छाप पाडणारा भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या मते, त्याच्या यशाचे गमक असे की, मी आपल्या मर्यादा ओळखल्या व आपल्यातील क्षमता मैदानात दाखवण्यासाठी मेहनत घेतली. आपल्या ३१ व्या जन्मदिनाच्या चार दिवसआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षलने आयपीएल २०२१ सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वतीने शानदार कामगिरी केली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २५ धावा देत दोन विकेट मिळवल्या व सामनावीर ठरला. सामन्यानंतर तो म्हणाला, मला माहीत होते की, मी वरिष्ठ पातळीवर खेळू शकतो. मी वरिष्ठ पातळीवर फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही गोष्टींत चांगली कामगिरी करू शकतो. मी आपल्या क्षमतेचा सर्वोत्कृष्ट प्रयोग करण्यासाठी अथक मेहनत घेतली. भारतीय संघात मी खेळू शकणार नाही, असा विचार मी केव्हाच केला नव्हता. हर्षलने २००८-०९ मध्ये विनू मांकड ट्रॉफीत पदार्पण करत २३ विकेट मिळवल्या. त्यानंतर गुजरातसाठी खेळलो व २०१० अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाचा भाग राहिला. रणजी चषकात त्याला गुजरातसाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, तेव्हा तो हरियाणाच्या वतीने खेळू लागला व २०११-१२ मध्ये २८ विकेट मिळवल्या. तो म्हणाला की, स्थानिक क्रिकेट खेळत मला आपल्यातील क्षमता कळली व त्यावरच मी मेहनत घेतली. वेगवान गोलंदाजाला वेग लागतो, पण मी १३५ किमी प्रती तासापेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकू शकत नाही. खूपच प्रयत्न केल्यास १४० पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग मी दुसऱ्या गोष्टींवर फोकस केला व आपल्यातील कौशल्याला उजाळा दिला. माझी ॲक्शन बायो मॅकेनिक्सच्या दृष्टीक्षेपात योग्य नाही, पण हिच माझी खरी ताकद आहे. त्याचमुळे फलंदाजांना माझ्याविरुद्ध खेळताना अडचणी येतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …