‘तो’ निर्णय अन्यायकारक – शोएब अख्तर

कराची – रविवारी ऑस्ट्रेलियाच्या रूपात जगाला नवा टी-२० विश्वविजेता मिळाला. डेव्हिड वॉर्नर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र वॉर्नरला देण्यात आलेल्या या मालिकावीर पुरस्कारामुळे पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचा किताब मिळाला. त्याने ७ डावात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. तसेच ३ अर्धशतके ठोकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४७ होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची त्याची सर्वात मोठी खेळी खेळली. टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या तीन डावात वॉर्नरने अनुक्रमे नाबाद ८९, ४९ आणि ५३ धावा केल्या. म्हणजेच संघाच्या गरजेच्या वेळी त्याने स्वत:ला सिद्ध केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या स्पर्धेत सर्वाधिक ३०३ धावा केल्या. वॉर्नर दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळेच मालिकावीर पुरस्कार बाबरला द्यायला हवा होता, असे शोएबने म्हटले आहे. वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देणे चुकीचा निर्णय असल्याचे शोएब म्हणाला. ट्विट करत शोएब म्हणाला की, मी प्रतिक्षा करत होतो की, बाबर आझमला मालिकावीर पुरस्कार दिला जाईल. हा नक्कीच अन्यायकारक निर्णय आहे. केवळ अख्तरच नाही तर पाकिस्तानच्या अनेक चाहत्यांनी वॉर्नरपेक्षा अधिक धावा करणाऱ्या बाबरला हा पुरस्कार देणे योग्य ठरले असते, अशी मते सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …