… तोवर वानखेडेंबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही – नवाब मलिकांची हमी

 मुंबई- क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत आर्यन खानसह अनेकांना ताब्यात घेतल्यापासूनअल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर सुरू असलेली आरोपांची मालिका आता काही काळापुरती थांबणार आहे. हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांनी हायकोर्टात दिली आहे. यामुळे अखेर वानखेडे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आले होते. आता याप्रकरणी ९ डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी दरदिवशी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सारेच वातावरण ढवळून निघाले. मलिक यांचे आरोप वानखेडे कुटुंबीयांनी फेटाळल्यानंतरही मलिक यांनी नवनवे दावे करणे सुरूच ठेवले. त्यामुळे संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा ठोकला, तसेच मलिक यांना रोखा, अशी विनंती केली. मात्र उच्च न्यायालयाच्या एकसदस्य न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेली विनंती फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांच्या वतीने अ‍ॅड. दिवाकर राय यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी तातडीने सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने केवळ वानखेडे यांच्या कुटुंबीयांवर आरोप करणाºया नवाब मलिक यांच्या वकिलांना चांगलेच धारेवर धरले. मलिक यांच्या आरोपात तथ्य आहे, तर त्यांनी केवळ आरोप न करता वानखेडे यांच्याविरोधात रीतसर तक्रार का केली नाही. केवळ ट्विट करून किंवा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे?, प्रसिद्धी मिळावी म्हणून असा प्रकार केला जात आहे का?, असे अनेक प्रश्­न खंडपीठाने उपस्थित करत पुढील सुनावणी होईपर्यंत वानखेडे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करू नये, असे निर्देश देत याचिकेची सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …