ठळक बातम्या

ते पाठीचा कणा नसलेले, शमीला ट्रोल करणाऱ्यांना विराटने फटकारले

दुबई – भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर धर्माच्या आधारे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर निशाणा साधणाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्याने या ट्रोलर्सना पाठीचा कणा नसलेल्या लोकांचा समूह असल्याचे सांगितले.

पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवानंतर शमी टिकाकारांच्या निशाण्यावर होता, पण विराट तेव्हा सामन्यानंतर म्हणालेला की, पाकिस्तानने भारतीय संघापेक्षा चांगली कामगिरी केली. शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, मैदानात आमच्या खेळण्यासाठी एक चांगले कारण आहे. सोशल मीडियावर आपले मत मांडणारी लोक पाठीचा कणा नसलेली असतात, त्यांच्यात समोरा-समोर मत मांडण्याची हिम्मत नसते. तो पुढे म्हणाला, ही माणुसकीमधील सर्वात खालची पातळी आहे. कोणाच्या धर्माच्या आधारे त्यावर हल्ला करण्यापेक्षा जास्त निराशाजनक काहीच नसते. मी केव्हाच धर्माच्या आधारे पक्षपात करण्याबाबत विचार केला नाही. धर्म खूपच पवित्र गोष्ट आहे. आपल्यातील बंधुभाव व मित्रत्वाला कोणीच भेदू शकत नाही व आम्हाला या गोष्टींने काहीच फरक पडत नाही. जी लोक आम्हाला समजतात, आम्ही त्यांना श्रेय देतो. भारताच्या पराभवानंतर शमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असंख्य संदेश आले, ज्यात लिहिले होते की, तू गद्दार आहेस व तुला भारतीय संघातून बाहेर करायला हवे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांसह प्रत्येक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दरम्यान शमीला आपला पाठिंबा दर्शवला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …