मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाचा दोन संशयित व्यक्तींनी पत्ता विचारल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने पोलिसांना दिली, त्यानंतर खळबळ माजली होती. अँटिलियाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास मोहीम राबवून एकाला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती गुजरातमधील टॅक्सी चालक असून, तो मित्रांसह मुंबईत फिरण्यासाठी आला आहे. त्याला अँटिलिया हे मुकेश अंबानींचे निवासस्थान पाहायचे होते, त्यासाठी त्याने टॅक्सी चालकाला अँटिलियाचा पत्ता विचारला होता.
सोमवारी आझाद मैदान किल्ला कोर्ट परिसरात एका टॅक्सी चालकाला दोन संशयित व्यक्तींनी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाचा पत्ता विचारला होता. ते दोघे एका वॅगनार कारमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी वॅगनारचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्यात आले, तसेच संशयितांचे स्केचदेखील तयार करण्यात आले. अखेर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्या दोन संशयास्पद व्यक्तींचा शोध सुरू केला. वाशीहून मुंबईला आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो टॅक्सी चालक आणि त्याच्या मित्राने अँटिलियाचा पत्ता विचारला होता. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. प्राथमिक चौकशीत अँटिलियाला कोणताही धोका नसल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. आपण मित्रांसोबत दक्षिण मुंबईत फिरायला आलो. अँटिलिया हे अंबानींचे निवासस्थान पाहायचे होेते, त्यासाठीच पत्ता विचारला होता, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने दिली. अशा खुलाशामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …