दुबई – भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा बुधवारी म्हणाला की, संघ जेव्हा रविवारी येथे टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात करेल, तेव्हा अपेक्षा आहे की, अष्टपैलू हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यास तयार होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात विराट कोहलीला आराम दिला गेला, त्यामुळे संघाचे नेतृत्व रोहितने केले. तो म्हणाला की, मुख्य स्पर्धेत संघाला सहाव्या गोलंदाजाची गरज भासेल. हार्दिक चांगली प्रगती करतोय, पण त्याला गोलंदाजी करण्यास काही वेळ लागेल. त्याने अद्याप गोलंदाजी केलेली नाही, पण तो स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत गोलंदाजी करण्यास तयार होईल. आमचे मुख्य गोलंदाज खूप चांगले आहेत, पण आपणास सहाव्या गोलंदाजासाठी एका पर्यायाची गरज भासेल. भारत रविवारी आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना करेल. स्पर्धेआधी पंड्याची फिटनेस चिंतेचा विषय आहे, कारण त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. संघ व्यवस्थापनाला वाटते की, पंड्याची गोलंदाजी संघाला संतुलन देईल. विराटशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमीला देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात आराम दिला गेला. रोहित म्हणाला की, आम्ही सहाव्या गोलंदाजी पर्यायाच्या शोधात आहोत. फलंदाजीत ही आम्हाला काही पर्याय हवेत.