सिडनी – क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)चे अध्यक्ष रिचर्ड फ्रायडेनस्टीन यांनी शनिवारी स्वीकारले की, बोर्डाने महिला सहकर्मीला घाणेरडे संदेश पाठवण्याप्रकरणी सुरुवाती तपासानंतर टिम पेनला कसोटी कर्णधारपदावरून न हटवण्याची मोठी चूक आम्ही केली होती.
पेनने एका महिला सहकर्मीला आपले अश्लील छायाचित्र व घाणेरडे संदेश पाठवण्याबाबत खेद व्यक्त करत शुक्रवारी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. फ्रायडेनस्टीन सीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी २०१८ च्या निर्णयाबाबत बोलू शकत नाही, कारण मी तेथे नव्हतो. पण मी तथ्यांच्या आधारे बोलत आहे की, सध्याच्या काळात बोर्ड अशाप्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले, मी स्वीकार करतो की, त्या निर्णयाने स्पष्ट रूपात चुकीचा संदेश दिला की, तो व्यवहार स्वीकार्य असून त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत सर्वोच्च निकष व्हायला हवेत. हे प्रकरण २०१७ चे आहे व ज्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया व क्रिकेट तस्मानियाच्या तपासात त्याला क्लिन चीट मिळाली होती. पेनला २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर संघाचे कर्णधार बनवण्यात आले होते. फ्रायडेनस्टीन म्हणाले की, आचारसंहिता आता उपयुक्त आहे. हे लक्षात असावे की, वेळेनुसार खूप काही गोष्टी बदलत जातात. ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांत आलेल्या बातमीनुसार, क्रिकेट तस्मानियाच्या एका महिला कर्मचारीने दावा केला होता की, पेनने तिला अश्लील छायाचित्रासह घाणेरडे संदेशही पाठवले होते. त्या महिलेने २०१७ मध्येच ही नोकरी सोडली होती.