आजच्या काळात बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहे. आजच्या काळात ही लोकांची गरज बनली आहे, क्वचितच असा कोणी असेल ज्यांच्या कुटुंबात स्मार्टफोन नसेल. दिवसभर फोन वापरल्यानंतर त्याची बॅटरी कमी होताच लोक थेट चार्जर शोधू लागतात, पण तुमचा फोन चार्ज केल्यानंतर, तुमच्यापैकी किती लोक असतील जे फोन चार्ज झाल्यावर स्विच आॅफ करतात.
होय, तुम्हालाही वाटायला लागले का की तुम्हीही हे करत नाही. फोन चार्ज केल्यानंतर, फोन चार्जरपासून वेगळा करण्याची आणि आपले काम करायला लागायची आपल्याला खूप वाईट सवय आहे, पण हे कृत्य तुमच्यासाठी घातकही ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये असे दिसून येते की, चार्जरमधून फोन काढल्यानंतर स्वीच बंद केला नाही तर कोणता अपघात होऊ शकतो?
ळँी श््र१ं’ टी्िरं खङ्मँङ्म१ ????? नावाच्या फेसबुक पेजवर ही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. मोबाइल चार्ज केल्यानंतर त्या व्यक्तीने स्वीच बंद केला नाही आणि अचानक त्यातून बाहेर पडलेल्या ठिणगीने पेट घेतला. त्यामुळे ब्लँकेट, बेडशीट जळून खाक झाल्या. या पोस्टला आतापर्यंत हजारो वेळा लाइक करण्यात आले आहे. मोबाईल चार्ज केल्यानंतर स्वीच बंद न केल्याचा हा परिणाम असल्याचे फोटोच्या कॅप्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे.
मोबाइल चार्जरमध्ये स्फोट. अशा प्रकारे स्फोट घडतात.
ही पोस्ट शेअर केल्यानंतर व्हायरल झाली. यावर लोकांनी खूप कमेंट केल्या. मोबाइल चार्ज झाल्यानंतर तो कधीही स्विच आॅन ठेवणार नाही, असे एका व्यक्तीने लिहिले आहे. तसेच एकाने लिहिले की अनेकदा तोही असेच करतो. फोटो पाहून समजू शकते की, मोबाइल चार्ज केल्यानंतर तो बंद झाला नाही, त्यामुळे बेडवर जळल्याची खूण तयार झाली होती.