ठळक बातम्या

तुमचे शौर्य, बलिदानाबद्दल देश सदैव ऋणी राहील – कोविंद

* मुंबई हल्ल्यातील शहिदांना राष्ट्रपती, पंतप्रधानांची श्रद्धांजली
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबईवरील २६-११च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटु स्मृतींना उजाळा देत या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना आणि शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाºयांना श्रद्धांजली वाहिली. देशभरातून विविध कार्यक्रमांद्वारे मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘२६-११च्या हल्ल्यातील शहिदांना माझी श्रद्धांजली. सुरक्षा जवानांचे शौर्य आणि बलिदानाबद्दल देश सदैव तुमचा ऋणी राहील, असे ट्वीट कोविंद यांनी केले. संसदेत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मुंबईवरील २६-११च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. त्या हल्ल्यावेळी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाºया सुरक्षा कर्मचाºयांनी मोदींनी श्रद्धांजली वाहिली. २६-११च्या शुरवीरांना नमन जय हिंद, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. सीमेवरील प्रतिकुल परिस्थितीत कुटुंबांपासून दूर राहुन देशाचे रक्षण करतो, दहशतवादी हल्ल्यावेळी बलिदान देऊन निष्पाप लोकांचा वाचवतो, जीवाची नाही तर जगाची काळजी करतो, देशाची शान-असा माझ्या देशाचा जवान, अशा भावना राहुल यांनी व्यक्त केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादी हल्ल्यातील सामान्य नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आणि शहिद जवानांच्या शौर्याला सलाम केला. इस्त्रायलमधील भारतीयांनीही २६-११च्या स्मृतीदिनी विविध कार्यक्रमांद्वारे मृतांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात १६६ निरपराध लोक मारले गेले होते. यांमध्ये भारतीयांसह इस्त्रायल, अमेरिकेच्या नागरिकांचा देखील समावेश होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …