मुलींच्या सौंदर्याचे मोजमाप तिचे सुंदर आणि मजबूत केस मानले जातात. आता मजबूत म्हणजे तुम्हाला हे समजणार नाही की, केस ५०-६० किलो वजन उचलतील. तसे, एका ब्रिटिश महिलेचे केस इतके मजबूत आहेत की, ती तिच्या केसांच्या जोरावर स्वत:ला लटकवू शकते. तसेच केस महिलेचे संपूर्ण वजन सहन करण्यास सक्षम आहेत. क्लो वॉल्श नावाच्या या महिलेचे केस इतके मजबूत आहेत की, ती केसांच्या साहाय्याने स्वत:ला लटकवून सर्कसमध्ये स्टंट करते. तिची छायाचित्रे पाहून तुम्हालाही एकदा वाटेल की, ही एक युक्ती आहे; पण प्रत्यक्षात तीच वस्तुस्थिती आहे.
क्लो वॉल्श मूळची लिव्हरपूलची असून, ती गेल्या ७ वर्षांपासून सर्कसमध्ये काम करत आहे. केसांनी लटकण्याची ही प्रथा तिने आपली आवड बनवली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिने २०१४ पासून सर्कसमध्ये हेअर हँगर म्हणून काम करायला सुरुवात केली.
व्यावसायिक हेअर हँगर असणे हे पारंपरिक व्यवसायापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यामध्ये कलाकाराला केसांच्या साहाय्याने स्विंग करावे लागते आणि काही स्टंट्स करावे लागतात, जे लोकांचे मनोरंजन करतात.
क्लो वॉल्श, तिच्या केसांमध्ये हुप्स घेऊन स्वत: ला लटकवते आणि हवेत सुंदरपणे स्विंग करते. तिने लहान वयातच नृत्याचे प्रशिक्षण घेतले आणि प्रवासादरम्यान तिला सर्कसमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे ती सांगते.
ती म्हणते की, तिला नेहमीच डान्सर आणि परफॉर्मर व्हायचे होते. लहानपणापासून तिने यासाठी खूप मेहनतही घेतली. तिने विद्यापीठातून परफॉर्मिंग आटर््सची पदवीदेखील घेतली आणि सर्कसमध्ये काम करण्याची इच्छा नव्हती.
२०१४ मध्ये जेव्हा तिने पहिल्यांदा सर्कसमध्ये काम केले, तेव्हा तिला ही जीवनशैली आणि प्रवास खूप आवडला. तिने हेअर हँग आणि एरिअल अॅक्ट शिकले आणि आता तिच्या मुलांनीही ही कला शिकावी, अशी तिची इच्छा आहे. बरेच लोक तिला असेही विचारतात की, तिचे केस तुटत नाहीत? प्रत्युत्तरात, क्लो म्हणते की, तिचे केस खूप मजबूत आहेत.
केस हँग करण्याच्या कलेमध्ये त्यांचा सर्व भार त्यांच्या केसांवर असतो. यामध्ये केस कसे बांधले जातात हे या कलेचे रहस्य आहे. त्यांना जगभर फिरावे लागते. यामुळे अनेकवेळा ती कुटुंबातील काही महत्त्वाच्या क्षणांचा त्याग करते; मात्र तिला तिचे काम खूप आवडते, असे ती सांगते.