तीस-तीसमध्येकोटींचा गंडा; आरोपींच्या घराची झडती

 

पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण कागदपत्रे सापडली

औरंगाबाद – शेंद्रा- बिडकीन डीएमआयसी परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घातलेल्या तीस-तीस योजनेतील प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी जोरदार तपासाला सुरुवात केली आहे. मुख्य आरोपी सचिन ऊर्फ संतोष नामदेव राठोड याचेएक घर सील करण्यात आलेअसून बीड बायपास भागातील घरात झाडाझडती घेतली. तेथे अनेक चिठ्या सापडल्या असून त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तीस-तीस प्रकरणात बिडकीन ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करणाऱ्या फियार्दीज्योती रघुनाथ ढोबळे यांनी दुसऱ्याच दिवशी तक्रार मागे घेत असल्याचा बॉंड लिहून दिला. त्यात त्या म्हणतात, माझ्याकडून घेतलेले दहा लाख रुपये ढोबळे याने माझे पैसे परत केले आहेत. माझी त्याच्याविरुद्ध फसविल्याची तक्रार नाही. तसेच, मी ढोबळेंना तीस-तीसमध्ये गुंतविण्यासाठी पैसे दिलेनव्हते. मंगळवारी बिडकीन ठाण्यात पहिली तक्रार दाखल झाल्यावर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गुंतवणुकदारांसह एजंटांचे धाबे दणाणले. रात्रीतून सूत्रे हलली आणि तक्रारदार ज्योती ढोबळेंना त्यांचे दहा लाख रुपये परत करण्यात आले. ही वार्ता दुसऱ्या दिवशी जिल्हाभर पसरली. त्यामुळे बिडकीन भागातील एका गुंतवणुकदाराने तर थेट विषारी द्रव असलेली बाटली हातात घेऊन आत्महत्येचा इशारा दिला. ही माहिती कळताच सहायक निरीक्षक संतोष माने तिथे दाखल झाले. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयज्प करणाऱ्याला रोखले. त्याला तक्रार देण्यासाठी ठाण्यात घेऊन गेले. त्याने दहा लाखांची गुंतवणूक केली असून त्याचे २ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपये अडकल्याचा दावा त्याने केला आहे. औरंगाबादेतील एकाचे ९५ लाख अडकल्याची पोलिसंाना माहिती मिळाली आहे.

आरोपींना अटकपूर्व अंतरिम जामीन :
विजय रामभाऊ ढोबळे आणि सचिन ऊर्फ संतोष नामदेव राठोड यांच्याविरुद्ध बिडकीन ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरु केल्या. ॲड. रवींद्र आडे यांच्या मार्फतीने न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्या. ए. ए. कुलकर्णी यांनी दोन्ही आरोपींना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व अंतरिम जामिन मंजूर केला. तसेच, पोलिसांना बोलावल्यानंतर हजर राहणे, यापुढील तारखांना हजर राहणे आदी अटी व शर्तींवर हा जामिन मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती ॲड. आडे यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …