तीन वर्षांनंतर क्रिकेटरच्या रूपात अनुष्काचे कमबॅक

भारतीय क्रिकेटर विराट कोहली नंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील आता क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तीन वर्षांनंतर कमबॅक आणि ओटीटी डेब्यू करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोेषणा करण्यात आली आहे. अनुष्काच्या आगामी चित्रपटाचे टायटल ‘चकदा एक्स्प्रेस’ असून, ही फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
‘चकदा एक्स्प्रेस’ ही एक बायोपिक आहे. हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेट कॅप्टन झूलन गोस्वामी यांच्यावर आधारित आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’मध्ये अनुष्का ही झूलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मेकर्सनी ‘चकदा एक्स्प्रेस’चा एक टिझर व्हिडीओ देखील रिलीज केला आहे, ज्यात अनुष्काचा फर्स्ट लूक पाहायला मिळतो.

या टिझर व्हिडीओची सुरुवात क्रिकेट मैदानापासून होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मॅच होणार असते. परिस्थिती अशी आहे की, महिला क्रिकेट टीमकडे स्वत:ची जर्सी देखील नाहीयं. दुसरीकडे लोकांना महिला क्रिकेटमध्ये जराही रुची नाहीयं. त्यामुळे मैदान रिकामे पडून आहे.
झूलन गोस्वामीच्या भूमिकेत अनुष्का शर्मा म्हणते,’जर जर्सी स्वत:च्या नावाची नाही, तर फॅन कुठले नाव फॉलो करणार?, पण काळजी करू नकात जर आज जर्सीवर आपले नाव लिहून घेतले तर उद्या आपली ओळखही नक्कीच बनवू.’ ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रोसित रॉयने दिग्दर्शित केला असून, कर्णेश शर्मा हा चित्रपट प्रोड्यूस करत आहेत. या चित्रपटाची कथा अभिषेक बॅनर्जीने लिहिली असून, अनुष्काने यापूर्वी प्रोसित रॉय बरोबर ‘परी’ हा चित्रपट केला आहे. अनुष्काने तीन वर्षांनंतर कमबॅक करताना एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. तिने चकदा एक्स्प्रेस तिच्याकरिता इतका महत्त्वाचा का आहे ते सांगितले. अनुष्का म्हणाली,’ही कथा एका बलिदानाची आहे. झूलन गोस्वामीचे आयुष्य प्रत्येकाला प्रेरित करते. ‘चकदा एक्स्प्रेस’ माजी महिला क्रिकेट कर्णधाराचे वेड आणि संघर्ष पडद्यावर दाखवणार आहे.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …