ठळक बातम्या

तीन पैशांचा तमाशा – आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

* पिता, पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारेसरकार
मुंबई- राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे सरकारमधील नेत्यांनी सरकारच्या कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर भाजपकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेतेआशिष शेलार यांनीही ठाकरेसरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार म्हणजेतीन पैशांचा तमाशा आहे.या सरकारला पिता, पुत्र आणि पुतण्याचीच चिंता आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला करतानाच सरकारच्या कामाचा पंचनामा केला. मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही. माझ्यापक्षा विषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले सरकार हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.
एक प्रसिद्ध नाटक होते’3 पैशांचा तमाशा’. या सरकारच्या तीन पक्षांचा ३ पैशांचा तमाशा गेली २ वर्षे सुरू आहेत. त्या नाटकामध्ये सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी अमर्याद आणि अमानुष पद्धतीचा वापर आणि दु:खाभोवतीची सहानुभुती असं या नाटकाचं कथानक होतं. आजच्या महाराष्ट्राची स्थिती देखील तशीच आहे. ही तीन नाती आणि तीन पक्ष यांचा सत्तेभोवतीचा लोभ, त्यातून संपत्तीचं निर्मिती आणि सामान्य नागरिक आणि महाराष्ट्राला दु:ख असं चित्र आहे. म्हणून हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार. हे सरकार जनतेभोवती केंद्रीत होण्याऐवजी पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवती केंद्रीत झालंय,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
मंदिरासाठी लोक आंदोलन करतात पण सरकारची भुमिका मदिरालय सुरु करायची होती. आमचा विरोध या गोष्टींना नाही तर प्राध्यान्यक्रमाने आहे. सुपुत्रीच्या प्रेमात काही चूक नाही, मात्र पुत्रीच्या प्रेमापोटी अनिल देशमुखांना गृहमंत्री बनवलेजातेआणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते. असा टोला शेलार यांनी पवारांना लगावलाय. पुतण्याबद्दल काय सांगावे त्यांच्या भितीने त्यांना वरच्या पदावर बसवलेजाते. मग एक हजार कोटीच्यावर बेनामी संपत्ती दिसते, असा आरोपही शेलार यांनी केलाय. तर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीवरूनही शेलार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. पीएमआरडीएत भूखंडाचे श्रीखंड बघायला मिळते. सरकारची कार्यपद्धती स्पष्ट आहे. अतर्क, असनदशीर आणि अहंकार अशीच आहे. पेट्रोल-डिझेलचा व्हॅट कमी होत नाही आणि दारुवरील कर कमी होतो? असा सवालही शेलार यांनी केला.
मी मंत्रालयात येणार नाही. काय करायचेतेकरा, मी अधिवेशन घेणार नाही, माझ्याविरोधात कार्टून सर्क्युलेट केले तर अटक करू, माझ्या विरोधात बोललात तर तुम्ही केंद्रीय मंत्री असला तरी तुम्हाला अटक करु, अशी दडपशाही केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहीरात देवून वातावरण निर्मिती करण्यात आलीय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा दिवस आहे, असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत आहेत, त्याचेसरकारला काही देणेघेण आहेका? असा सवालही शेलार यांनी केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …