तिला वाटते पाण्याच्या आवाजाची भीती, म्हणून करते आठवड्यातून एकदाच आंघोळ

पालक मुलांना रोज आंघोळ करायला शिकवतात. ज्या दिवशी मुलाने आंघोळ करण्यास नकार दिला, तेव्हा पालकही त्याला समजावून आंघोळ करायला भाग पाडतात. तसे, आंघोळ करणे ही एक चांगली क्रिया आहे, कारण दररोज आंघोळ केल्याने रक्ताचा प्रवाह व्यवस्थित राहतो आणि शरीराचे तापमान देखील नियंत्रणात राहते; पण या सर्व गोष्टींशिवाय एक महिला आठवड्यातून एकदाच आंघोळ करण्यावर विश्वास ठेवते.
इंग्लंडमधील डोरसेट येथे राहणारी ४९ वर्षीय नताली किंग ही शाळेत शिक्षिका आहे. ती तिच्या ४५ वर्षीय प्लंबर पती जेमीसोबत राहते. गंमत म्हणजे या महिलेचा नवरा प्लंबर असूनही ती पाण्यापासून लांब पळते. येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, महिला आठवड्यातून एकदाच आंघोळ करते आणि आठवड्यातून एकदा डिओडरंट वापरते.

महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिच्यासाठी खूप सुंदर बाथरूम बनवले आहे. त्यात त्याने बबल बाथ आणि लाइटिंगचीही व्यवस्था केली आहे; पण त्या महिलेला रोज आंघोळ करण्यात रस नाही. नतालीचा असा विश्वास आहे की, मानवी शरीर स्वत:ला आपोआप स्वच्छ करते, त्यामुळे दररोज आंघोळ करण्याचा काही उपयोग नाही. तिची कहाणी सांगताना ती म्हणाली की, ती लहान असताना गरिबीमुळे तिची आई आठवड्यातून एकदाच तिला आंघोळ घालायची. तिचे लांब केस धुणे आणि सोडवणे कठीण होते, म्हणून ती क्वचितच आंघोळ करत असे. तेव्हापासून तिला कमी आंघोळ करण्याची सवय लागली.
तिने सांगितले की, ती रोज स्वच्छ कपडे घालून तिच्या शाळेत जाते आणि कपड्यांना वास येऊ नये म्हणून कपड्यांमध्ये सुगंध फवारते. ती आठवड्यातून एकदाच आंघोळ करते. महिलेचा पती जेमी देखील तिच्यावर दबाव आणत नाही, तो स्वत: दररोज आंघोळ करतो. काहीवेळा तो नताली साबणाचा खर्च वाचवते असे विनोद करतो. नतालीने २००६मध्ये जेमीशी लग्न केले. त्यांना त्यांच्या पहिल्या नात्यातील २७ वर्षांचा मुलगा देखील आहे आणि जेमी आपल्या सावत्र मुलाची खूप काळजी घेते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …