हैदराबाद – तिरुपती हे अनेकांचे श्रद्धास्थान असून, अनेक भाविक आपल्या परीने येथे दान-धर्म करत असतात. श्रीमंत व्यक्तींनी अनेक वेळा तिरुपती बालाजीशिवाय इतर देवस्थानांना कोट्यवधींचे सोने अर्पण केले आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली. नुकतेच एका व्यक्तीने तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला सोन्याचा हात अर्पण केला आहे. या हातावर डायमंड व रुबी असून, याची किंमत ही तब्बल तीन कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. देवाला सोने अर्पण करणे याला आध्यात्मिक महत्त्व असण्यावर विश्वासाचा भाग आहे. अनेक धनाढ्य व्यक्ती संस्थानांकडे पैसे देण्याऐवजी हिरे, मोती आणि सोने यांच्या रूपी देवाला भेटवस्तू देत असतात. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर तिरुपतीमध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. दरम्यान, कोरोना काळात सध्या मंदिरे बंद आहेत, मात्र तरीही लोक मंदिरांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या भक्तीपोटी दान करत असतात. काही दिवसांपूर्वी तिरुमलाच्या श्री व्यंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्ताने सोन्याची तलवार अर्पण केली होती. तलवारीची किंमत जवळपास एक कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. हैदराबादचे उद्योगपती एम. एस. प्रसाद यांनी ही तलवार तिरुपती चरणी आपल्या भक्तीखातर दान म्हणून दिली होती.
One comment
Pingback: togelbet168