ठळक बातम्या

तिरंग्यातून मिळाली जॉन अब्राहमच्या कॉस्च्युमची आयडिया

सत्यमेव जयते-२ या चित्रपटात जॉन अब्राहमच्या वाट्याला तीन भूमिका आल्या आहेत. जॉन हा राजकारणी, पोलीस आणि शेतकरी अशा ट्रिपल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील अनेक सीनमध्ये तर तिघे एकाच फ्रेममध्ये दिसून येतात. त्यामुळे कॉस्च्युम डिझायनिंगच्या बाबतीत हा चित्रपट खूपच आव्हानात्मक ठरला. विशेष बाब म्हणजे चित्रपटातील त्याच्या कॉस्च्युमची आयडिया तिरंग्यातून आली आहे. चित्रपटाचे कॉस्च्युम डिझायनर अक्षय त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्याच्या भूमिकेत जॉनचे ७ ते ८ कॉस्च्युम चेंजेस आहेत, तर राजकीय नेत्याच्या भूमिकेत जॉनचे ११ ते १२ व कॉपच्या रोलमध्ये जॉनचे ७ ते ८ कॉस्च्युम चेंजेस आहेत.

एकूणच चित्रपटात जॉनला खूप साधे कपडे परिधान करायचे होते. जॉनने चित्रपटात कोणतीही डिमांड ठेवली नव्हती की, त्याचे कपडे ब्रँडेड असावेत. अक्षयच्या म्हणण्यानुसार, जॉन हा गेल्या १२ वर्षांपासून आपला पर्सनल टेलर राजू याच्याकडूनच कॉस्च्युम शिवून घेत आहे. येथेही त्याने तेच केले. या चित्रपटात त्याने आपले कॉस्च्युम तीन हजारांपेक्षा जास्त किमतीचे होऊ दिले नाहीत. या चित्रपटात एक सीन आहे, ज्यात दोन भावांची मारामारी दाखवण्यात आली आहे. तेव्हा दोघांना वेगवेगळे दाखवण्याकरिता तिरंग्याच्या रंगाचे कुर्ते वापरण्यात आले आहेत. ती कल्पना मुळात दिग्दर्शक मिलाप जव्हेरी यांची होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …