ठळक बातम्या

तिकीट वाटपाचे अधिकार अनिल परबांकडे, सूत्रांची माहिती

रामदास कदमांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले?
रत्नागिरी – राज्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्न्नागिरीतील मंडणगड, दापोली नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीची उमदेवारी डावलल्यानंतर मंडणगड आणि दापोलीतील निवडणुकीची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे देणे हा रामदास कदम यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण पुन्हा भोवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेने मंडणगड, दापोली नगरपंचायत निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी अनिल परबांकडे दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. परब यांनाच तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या दोन नगरपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या दोन्ही नगरपंचायतीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सर्व मटेरियल हे शिवसेनेचेच नेते रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेचे स्थानिक नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांविरोधात ईडीने जी कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढेच नाही तर रामदास कदमांचा एक कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असेही दिसत होते. मात्र, या ऑडिओ क्लिपशी आपला संबंध नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …