तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये आता दिसणार नाही जेठालाल?


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही एक अशी कौटुंबिक मालिका आहे, जी बºयाच काळापासून टीव्हीवर टेलीकास्ट होत आहे आणि या मालिकेला दर्शकांचेही भरभरून प्रेम मिळत आहे.

हा १३ वर्षांपूर्वीचा शो असूनही आजही तो टीआरपी लिस्टमध्ये आपली जागा टिकवून आहे. केवळ या मालिकेवरच नाही, तर मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे.
मग जेठालाल असो वा टप्पू, चाहते या व्यक्तिरेखांसोबत नेहमीच कनेक्ट राहिले आहेत. त्यामुळेच जेव्हा दयाबेन म्हणजे दिशा वकानीने हा शो सोडला तेव्हा प्रेक्षकांना खूप मोठा झटका

बसला. गेल्या काही काळात या शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. या मालिकेद्वारे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले अनेक कलाकारांनी हा शो सोडण्यास सुरुवात केली
आहे. टप्पूची भूमिका साकारणाºया राज अनादकटबद्दल नुकतीच खबर आली होती तो लवकरच या शोला अलविदा म्हणणार आहे आणि आता जेठालाल म्हणजे दिलीप जोशीही त्याच

रांगेत येऊन उभे राहिले आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा दिलीप जोशी यांना शो सोडण्याविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की माझा शो एक कॉमेडी शो आहे आणि त्याचा हिस्सा बनणे

खूप मजेदार आहे. त्यामुळे मी हा शो एंजॉय करत आहे तोपर्यंत करेन, परंतु ज्यावेळेस मला वाटेल की मला यातून आनंद मिळत नाहीयं तर मी त्या दिवशी पुढे जाईन.
दिलीप जोशी यांनी असाही खुलासा केला आहे की, त्यांना अन्य शोकडून अनेक नव्या आॅफर्स मिळत असतात परंतु ते या शोसाठी समर्पित आहेत. ते म्हणाले, मला अन्य शोच्या

आॅफर्स मिळतात, परंतु मला वाटते की जर हा शो चांगला चालला आहे तर दुसºया गोष्टींसाठी गरज नसताना हा शो का सोडायचा? हा एक सुंदर प्रवास आहे आणि मी यात खूश आहे.
लोकांचे आम्हाला भरभरून प्रेम मिळत आहे, तर मग कोणत्याही कारणास्तव मी हा शो बर्बाद का करेन?

.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …