मृतांच्या कु टुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख
चेन्नई – दिवाळीपूर्वी फटाक्यांची पॅकिंग सुरू असतानाच अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. तमिळनाडूतील कालाकुरिची येथील शंकरपूरम परिसरात असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाला आणि धूर कित्येक किलोमीटर लांबून दिसत होता, तसेच आगीनंतर फटाक्यांचाही स्फोट होत होता. या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य ९ जण जखमी झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृ ती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना तमिळनाडू सरकारकडून ५ लाखांची, तर जखमींना १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती मिळालेली नाही. दिवाळीमुळे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टॉक ठेवण्यात आला होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनमधून धूर येत असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच संपूर्ण गोडाऊनला आग लागली. आग लागल्याने फटाक्यांचा आवाज, नागरिकांचा आक्रोश या सर्वांमुळे एकच गोंधळ उडाला. फटाक्यांचा एकत्र स्फोट होत असल्याने संपूर्ण परिसर फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी पी. एन. श्रीधर यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत फटाक्यांच्या दुकानांना, गोदामांना आग लागल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात विरुद्धनगर जिल्ह्यातील थयालीपट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्याला आग लागली होती. त्यात १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ७ जण जखमी झाले होते. जून महिन्यात याच परिसरात एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या स्फोटात दोघांनी आपले प्राण गमावले होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सुद्धा फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यावेळी सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …