.तामिळनाडूत ओमिक्रॉनचा कहर

एकाच वेळी आढळले ३३ नवीन रुग्ण
देशभरातील ओमिक्रॉनग्रस्तांचा आकडा २८७ वर

नवी दिल्ली – ओमिक्रॉनने देशाच्या चिंतेत दररोजच भर पडत आहे. तामिळनाडूत गुरुवारी तब्बल ३३ नव्या ओमिक्रॉनबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे तामिळनाडूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली आहे. तामिळनाडूत ओमिक्रॉनचे आता एकूण ३४ रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वीच एक जणाचा अहवाल हा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये चेन्नईत २६, सलेममध्ये १, मदुरैत ४ आणि तिरुवनमलाईमध्ये २ रुग्ण आढळले आहेत.
देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. रोज नवीन राज्यांत संसर्ग पोहोचत आहे. परदेशात न जाताही लोकांना संसर्ग होत आहे. एवढेच नव्हे, अनेक राज्यांत संसर्गाचा वेग मांडणारी आर-व्हॅल्यू वाढू लागली आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोविड-१९च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या आठवड्यात ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी कोरोना रुग्ण वाढवू शकते, अशी भीती आहे. उत्तर प्रदेश, पंजाबसह निवडणूक असलेल्या पाच राज्यांत सभांना होणारी गर्दीचीही धास्ती आहे. म्हणूनच केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र पाठवून चाचण्या वाढवा, असे बजावले आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …