मुंबई – शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सध्या ऐकायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी विमा कंपनींच्या प्रतिनिधींना इशारा दिला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडेवाकडे करा असे काही सांगत नाही; पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कास्तकऱ्याला पीक विमा मिळू शकतो, तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …