ठळक बातम्या

…तर प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेणार : परिवहन मंत्र्यांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या २२९६ कामगारांना बुधवारी एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे आणि जर कर्मचारी कामावर आले नाहीत, तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला.
एसटी संपाचा बारावा दिवस आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. बुधवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले होते, तर गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं वक्तव्य केले. कर्मचारी कामावर आले नाहीत, तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे २०१६-१७ आणि २०१९मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे परब म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

4 comments