मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, जर देशातील क्रिकेट प्रशासन कर्णधार नियुक्त करण्यासाठी अशा खेळाडूच्या शोधात आहे, ज्याचा रेकॉर्ड डागाळलेला नाही, तर ऑस्ट्रेलिया संघाला पुढील १५ वर्षे कोणताच कर्णधार मिळणार नाही. टिम पेनने आपल्या सहकर्मीला वादग्रस्त संदेश पाठवण्याचा खुलासा झाल्यानंतर तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला, ज्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या शर्यतीत अग्रेसर असून माजी कर्णधार स्टीव स्मिथने देखील या शर्यतीत उडी घेतली आहे. क्लार्क म्हणाला की, रिकी पाँटिंग देखील आपल्या करिअरच्या चुकीच्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक राहिले आहेत. तो पुढे म्हणाला, पाँटिग यांचा बोरबोन ॲण्ड बीफस्टीक (नाईटक्लब) मध्ये वाद झाला होता. तेथे मारामारी झालेली. या कारणामुळे आपण त्यांना जबाबदारी सोपवली नसती का? हा एक शानदार उदाहरण आहे. त्याने आपणास दाखवले की, कशा वेळी, अनुभव, परिपक्वता, उच्च पातळीवर खेळणे व येथपर्यंत की, कर्णधारपदाबाबत त्याच्यात बदल आला. तो पुढे म्हणाला, नक्कीच, आपणास काही निकष बनवावे लागतील.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …