तरीही सामना कायम राहील – सीएसए वैद्यकीय अधिकारी

नवी दिल्ली – क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए)चे वैद्यकीय अधिकारी सुहैब मंजरा म्हणाले की, बीसीसीआय व सीएसए यांनी एकत्रितपणे सहमती दर्शवली की, जर खेळाडू वा सहयोगी स्टाफपैकी एखाद्याला कोविड-१९ ची लागण होते, तर दोन्ही संघ आगामी कसोटी व वनडे मालिका कायम राखतील व संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन राहण्यासाठी बंधनकारक करण्यात येणार नाही.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात करेल, ज्यानंतर दुसरा कसोटी जोहान्सबर्गमध्ये ३ ते ७ जानेवारीपर्यंत व तिसरा कसोटी सामना ११ ते १५ जानेवारीपर्यंत केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल, ज्यातील सामने १९, २१ व २३ जानेवारीला होतील. एक विशिष्ट सहमती अशी की, बीसीसीआय दौऱ्यावरून तेव्हाच माघार घेऊ शकतो, जर दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती आणखीन बिकट होईल, जिथे कोविडने नवे स्वरूप ओमिक्रॉन आढळले आहे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, सध्या तरी कोणी माघार घेईल अशी शक्यता वाटत नाही, तर दुसरीकडे मंजरा म्हणाले की, आम्ही भारतासमोर चर्चा केली व एक प्रोटोकॉलवर सहमती दर्शवली. बायो-बबलमधील सर्वांचे लसिकरण झाले आहे, तरी एखादा पॉझिटिव्ह आढळतो. त्याची स्थिती स्थिर असेल तरी तो हॉटेलात विलिगिकरण करू शकतो. ते पुढे म्हणतात, त्याच्या संपर्कात येणारे खेळाडू आपला सामना व सराव कायम राखतील, पण त्यांची रोज चाचणी केली जाईल. असे कळते की, रॅपिड अँटिजन चाचणी रोज करण्यात येईल व दोन्ही संघ पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तीमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीशी दोन हात करण्यास तयार आहेत. तरी देखील योग्य ती खबरदारी घेत ही मालिका कायम राखली जाईल. तसेच बीसीसीआय सीएसएच्या वतीने भारतीय संघासाठी निर्मित केलेल्या बायो-बबलवर समाधानी आहे. हो, आम्ही निश्चितपणे आपले खेळाडू व त्यांच्या कुटुंबाच्या सर्वोत्कृष्ट हितांच्या बाजूने निर्णय घेऊ. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने
गोपनियतेच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व जण बायो-बबलमध्ये आहेत. त्यांची नियमित चाचणी सुरू आहे. अधिकारी पुढे म्हणाले, वादाचा मुद्दा असा होता की, संपर्कात आलेल्या खेळाडूबाबत काय निर्णय घ्यावा. त्याला क्वारंटाइन करायचे की नाही. यावर सखोल विचार केला गेला, कारण अनेक खेळाडू एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे यावर निर्णय घेणे गरजेचे होते. भारताचा दौरा दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या व्यावसायिक अधिकारासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांना या मालिकेच्या प्रक्षेपण अधिकारातून मोठी रक्कम मिळेल. भारतीय संघ सेंच्युरियनमधील एका रिसॉर्टमध्ये असून बायो-बबलचे एक उत्तम कवच त्यांच्याभोवती आहे. तसेच हे रिसॉर्ट असल्याने पंचतारांकित हॉटेलप्रमाणे त्यांच्यावर येथून-तिथे फिरण्याचे कोणतेच बंधन नाही. खेळाडूप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनाही रिसॉर्टमध्ये मनमोकळेपणाने फिरण्याची परवानगी आहे. दरम्यान, या मालिकेतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …