मुंबई – सोशल मीडिया सध्या अनेक मॅट्रिमोनियल साईट आहेत. ज्यावर अनेक तरुण-तरुणी आपले जोडीदार निवडत असतात, पण याचाच फायदा घेऊन अनेक जण फसवणूक करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. असाच काहीसा प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुबाडणाऱ्या सायबर चोराला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या भामट्याने २०१३ पासून तब्बल १२ महिलांची फसवणूक करुन लाखो रुपये उकळल्याचेही निष्पन्न झाले आहे. महिलांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याचे नाव सतीश गरुड असे आहे. सतीश गरुड क्रिमिनल सायकोलॉजी आणि एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार होता, मात्र आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर त्यांने महिलांना फसवण्यासाठी केला. लग्नाचे आमिष दाखवून बारा महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.
सतीश अशाच महिला नेमायचा ज्यांचं वय अधिक असायचं, ज्यांना आधार नसायचा किंवा ज्यांना घरातून लग्नासाठी दबाव असायचा. अशा महिलांशी बोलून तो त्यांना जाळ्यात अडकवायचा आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी बोलून त्यांना आपली भूरळ घालायचा आणि फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्यानंतर तो तिथून पळ काढायचा. सायबर पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला. तेव्हा त्यांना आढळलं की, या महिलांचं वय ३० पेक्षा अधिक आहे किंवा त्या घटस्फोटित आहेत. त्यांना हा भामट्या प्रामुख्यानं निशाणा बनवायचा. त्यांचीच फसवणूक करायचा. आपल्या गोड बोलण्यामध्ये हा महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. महिला त्याच्या भूलथापांना बळी पडायच्या आणि त्याच्या जाळ्यात ओढल्या जायच्या. दरम्यान, मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार सध्या वाढले असून महिलांनी काळजी घेणं गरजेचे आहे आणि असंच आवाहन मुंबई पोलिसांकडूनसुद्धा महिलांना करण्यात आलं आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …