ठळक बातम्या

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट


कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया श्राइवर यांचा जवळपास दहा वर्षांच्या दुराव्यानंतर

घटस्फोट झाला आहे. आता पुन्हा एकदा हे दोघे सिंगल आहेत. या दोघांचा मंगळवारी सकाळी लॉस एंजेलिसच्या सुपिरिअर कोर्टात घटस्फोट झाला. एका खासगी वकिलाच्या
उपस्थितीत हा घटस्फोट झाला. ज्याने या महिन्याच्या सुरुवातीलाच घटस्फोटाच्या पेपरवर आपली मोहोर लावली होती.

अर्नोल्ड आणि मारिया यांच्या घटस्फोटाला इतका मोठा काळ लागला, कारण या दोघांना आपल्या घटस्फोेटाची एकतर बिल्कुल घाई नव्हती आणि दुसरे म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी सेटलमेंटच्या अ‍ॅग्रीमेंटला खूप वेळ लागला. खूप आधीपासूनच हे दोघे वेगळे राहू लागले होते. खरेतर या दोघांचे नातेसंबंध फार काही खराब झाले नव्हते आणि हे दोघे फॅमिली गॅदरिंग आणि
आपल्या चार मुलांबरोबर नेहमी एकत्र दिसून यायचे.

जवळपास दहा वर्षांपूर्वी अर्नोल्ड आणि मारिया हे वेगळे झाले होते, जेव्हा मारियाला कळले होते की, अर्नोल्ड हा घरात काम करणाºया मेडच्या मुलांचा पिता आहे. आता तो मुलगा म्हणजे
जोसेफ बाएना कॉलेजमध्ये शिकत असून, त्याला भविष्यात अ‍ॅक्टर बनण्याची इच्छा आहे. जोसेफ दिसतोही आपल्या वडिलांसारखाच. अर्नोल्ड आणि मारिया यांची जवळपास ४०० मिलीयन डॉलर्सची संपत्ती असून, सूत्रांच्या म्हणण्यानुसार तिची दोघांमध्ये समान वाटणी झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …