ठळक बातम्या

तब्बल तीन वर्षांनंतर सुधा भारद्वाज तुरुंगातून बाहेर

माध्यमांसमोर न बोलण्याचा कोर्टाचा आदेश
मुंबई – भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि शहरी नक्षलवादप्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज या तब्बल तीन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. सुधा भारद्वाज (५९) या गुरुवारी दुपारी १२.४१ वाजता मुंबईतील भायखळा तुरुंगातून बाहेर आल्या. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर बुधवारी त्यांना एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. एनआयए न्यायालयाने त्यांच्यावर १६ अटी लादल्या असून, ५० हजार रुपयांचे हमीपत्र भरून घेतले आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय सुधा भारद्वाज यांना मुंबई सोडता येणार नाही, असा आदेश देण्यात आला आहे.
एनआयए न्यायालयाने सुधा भारद्वाज यांच्या जवळच्या तीन नातेवाईकांचा पत्ता आणि सर्व माहिती जमा करण्याचा आदेश त्यांना दिला आहे, तसेच या प्रकरणाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी माध्यमांसमोर बोलू नये, असा आदेशही सुधा भारद्वाज यांना दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात एनआयएने सवार्ेच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सवार्ेच्च न्यायालयाने एनआयएची याचिका फेटाळून लावली. भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपात सुधा भारद्वाज यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने कायद्याने ठरवून दिलेल्या कालावधीत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …