ठळक बातम्या

तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंग वाढवले नाही, तर अजून जीव जातील!

डब्ल्यूएचओचा गंभीर इशारा
५७ देशांत पोहोचला ओमिक्रॉन

नवी दिल्ली – जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती पसरू लागली आहे. एकीकडे काही शास्त्रज्ञ ओमिक्रॉन आधीच्या व्हेरिएंट इतका घातक नसल्याचे सूत्र मांडत आहेत, तर दुसरीकडे काहीजण अधिक काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत, पण या सर्वांनीच ओमिक्रॉनबाबत अधिक सखोल संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर आता थेट जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रॉस यांनीच ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना गंभीर इशारा दिला आहे. ओमिक्रॉनला रोखायचे असेल, तर हीच योग्य वेळ आहे, अशा शब्दांत त्यांनी जगाला सतर्क केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनबाबत जगातील सर्वच देशांना आवाहन केले आहे. आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की, त्यांनी सतर्क राहून तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंगची संख्या वाढवायला हवी. यामध्ये आता कोणताही गोंधळ झाला, तर त्यात अजून जीव जातील, असे टेड्रॉस म्हणाले आहेत.

दरम्यान, जगातील सर्व देशांनी यावर तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत. आज आणि येणाºया काही दिवसांत जगभरातील देश जी पावले उचलतील, त्यावरच ओमिक्रॉन व्हेरिएंट कशा पद्धतीने वाढेल, हे अवलंबून असेल. जर इतर देश त्यांच्या रुग्णालयांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण दाखल होण्याची वाट पाहू लागले, तर फार उशीर होईल. अजिबात वाट पाहू नका, आता पावले उचला, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट आता जवळपास ५७ देशांमध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे. तो अजून वेगाने इतर देशांमध्येही पसरेल, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेला वाटत आहे. ओमिक्रॉनचे जागितक पातळीवर वेगाने पसरणे किंवा ३० हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की, त्याचा कोरोना साथीच्या एकूणच घडामोडींवर मोठा परिणाम होऊ शकतो, पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आता सांगता येणे कठीण आहे, असे टेड्रॉस यांनी नमूद केले आहे. दररोज ओमिक्रॉनविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे, पण याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना अजून वेळ मिळणे गरजेचे आहे. त्याशिवाय निश्चित अशा निष्कर्षापर्यंत पोहोचणे कठीण आहे. जागतिक आरोग्य संघटनादेखील दररोज जगभरातील हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून याविषयी अभ्यास करत आहे, असेदेखील ते म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …