ठळक बातम्या

डोंबिवली बॉइज संघाचा मोठा विजय

डोंबिवली – सलामीवीर प्रथम नांबियारचे झंझावाती अर्धशतक आणि क्रिष्णा पटेलच्या भेदक गोलंदाजीमुळे डोंबिवली बॉइज एकादश संघाने साऊथ मुंबई क्रिकेट क्लबचा ८० धावांनी पराभव करत क्रिकेट इन्स्टट्यिूशन ऑफ डोंबिवली आयोजित मर्यादित ४० षटकांच्या सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. निळजे येथील हभप मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात डोंबिवली बॉइज एकादश संघाने प्रथम फलंदाजी करत ८ फलंदाजांच्या मोबदल्यात ४० षटकांत १९८ धावा केल्या. प्रथम नांबियारने ५४ धावा केल्या. तेजस राजपूतने तीन आणि केतन जोशीने तीन फलंदाज बाद करत सामन्यावर आपली छाप पाडली. प्रत्युत्तरादाखल साऊथ मुंबई क्रिकेट क्लब संघाला केवळ ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. चार चौकार आणि एक षटकार ठोकत ५० धावा करणाऱ्या रिदय खांडकेचा अपवाद वगळता साऊथ मुंबई क्रिकेट क्लबच्या इतर फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले. क्रिष्णा पटेलने २० धावांत ३, तर यश सिंगने १० धावांत २ विकेट्स मिळवून डोंबिवली बॉइज एकादश संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. क्रिष्णा पटेलला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …