ठळक बातम्या

डोंबिवलीत दारूड्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

डोंबिवली – दारूड्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे, तसेच हा नराधम बाप आपल्या दुसऱ्या आठ महिन्यांच्या मुलीला जबरदस्तीने दारू पाजायचा. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीवरून ४९ वर्षीय नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली पश्चिमेत ९ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून नराधम बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने आई गावाहून परत आल्यानंतर सर्व घडलेला प्रकार सांगितला. याबाबत पत्नीने विचारणा करताच ती लहान असल्याचे सांगून तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, असे तो बायकोला सांगायचा. त्यामुळे पत्नीने दुर्लक्ष केले होते. आरोपी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन बायकोशी भांडायचा तसेच आपल्या दुसऱ्या आठ महिन्यांच्या मुलीला दारू पाजत असे, याला विरोध केला म्हणून त्याने आपल्या पत्नीलादेखील बेदम मारहाण केली. त्यानंतर एका दिवशी बेडरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज आला असता, बापाने दरवाजा न उघडता काही झाले नसल्याचे सांगितले. सकाळी आईने मुलीला रात्री का रडत होतीस? असे विचारले असता, बापाने केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून विकृत बापाला बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …